हिंगोली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 6 ऑगस्टपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून लॉकडाऊन लागू केले असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. भाजीपाला आणि किराणा दुकाने बंद राहणार आहेत. तर दुसरीकडे मात्र वंचितचे कार्यकर्ते हे लॉकडाऊन तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान हालचालीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने चेक पॉइंट लावण्यात आले आहेत.
आजपासून हिंगोलीत 14 दिवसांचे कडक लॉकडाऊन; फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 6 ऑगस्टपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून लॉकडाऊन लागू केले असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे.
आजपासून हिंगोलीत 14 दिवसाचे कडक लॉकडाऊन; फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
नाहक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला व किराणा दुकान हे तब्बल 14 दिवस बंद ठेवण्यात आल्याने शहरात स्मशान शांतता पसरलेली आहे. तर पोलीसही लहान-सहान हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. असे असले तरीही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मात्र हा लॉकडाऊन तोडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत.