हिंगोली -जिल्ह्यात अजूनही चोरीछुपे सागवान लाकडाची सर्रासपणे कापली जात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील पेडगाव, वडगाव शिवारात छापा मारून 50 लाख रुपयांचे सागवान जप्त केले. या कारवाईने लाकूड माफियाचे धाबे दणाणले आहेत.
आखाडा बाळापूर परिसरात चोरून सागवान घेऊन जात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी त्यांच्या पथकासह आखाडा बाळापूर परिसरात धाव घेतली. त्या ठिकाणी ट्रक चालक एका झाडीमध्ये ट्रक नेऊन लपवून ठेवत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे लाकूड कंपन्यांना संदर्भात काही परवाना किंवा लाकडावर कोणता स्टॅम्प दिसून आला नाही.