महाराष्ट्र

maharashtra

'त्या' खुनी सासऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या

By

Published : Nov 4, 2020, 10:38 PM IST

आपल्याच जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

मृत जावई
मृत जावई

हिंगोली - वाळूच्या वाहनावर कारवाई करण्याचा बहाण्याने सासऱ्याने इतर तीन ते चार जणांच्या मदतीने जावयाला मारून पाय बांधून विहिरीत फेकून दिले होते. या प्रकरणी तलाठी असलेल्या सासऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मधुकर नामदेव लोणकर (रा. जिजामाता नगर, हिंगोली), असे आरोपी सासऱ्याच नाव आहे. आरोपीने 30 ऑक्टोबर रोजी जावई वैभव जयचंद वाठोरे (वय 21 वर्षे) यास बाभूळगाव येथे वाळूचे ट्रॅक्टर पकडण्याचा बहाणा करून सेनगाव तालुक्यातील चांगेफळ शिवारात नेऊन तीन ते चार जणांनी संगनमत करून, मारहाण करून, हरिश्चंद्र रामप्रसाद शिंदे यांच्या विहिरीत हात पाय बांधून टाकून दिले होते.

नरसी पोलीस ठाण्यात झाला होता खुनाचा गुन्हा दाखल

या प्रकरणी नरसी पोलीस ठाण्यात मृताचे वडील जयनंद काशीनाथ वाठोरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा फरार झाला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे व कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमून आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले.

आरोपीने इच्छेविरोधात लावून दिला होता घरगुती विवाह

मृत वैभव आणि आरोपीच्या मुलगीचे प्रेमसंबंध होते. यामुळे ते दोघे लग्न करणार होते. मात्र, आरोपीने स्वतःची इच्छा नसताना आपल्या मुलीचा विवाह घरीच लावून दिला होता. मात्र, काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये होत आलेल्या भांडणाला कंटाळून आरोपीने घरगुती फारकतही घेतली होती. मात्र, ही फारकत वैभवला मान्य नव्हती. तर मधूकर हे आपल्या मुलीच्या विवाहासाठी दुसरे स्थळ ही बघत होते. यासाठी वैभव हा अडथळा ठरत होता. म्हणूनच त्याचा काटा काढण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.

खिशात चिठ्ठी लिहून केला होता आत्महत्येचा बनाव

वैभवने आत्महत्या केली, असा संशय यावा यासाठी मधूकरने वैभवच्या खिशात एका कापडात स्टेपल करून चिठ्ठी लिहून ठेवली होती. तत्पूर्वी वैभवला आरोपीने दारू पाजली होती. नंतर तीन ते चार जणांनी मृताला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचे हात पाय बांधून त्याला विहीरीत ढकलून दिले.

हेही वाचा -'त्या' मृतदेहाची ओळख पटली, सासऱ्यानेच केला जावयाचा खून

ABOUT THE AUTHOR

...view details