हिंगोली - शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लाला लजपतराय नगरमध्ये जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख 3 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस जुगाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाईचा धडाका सुरू आहे. या ठिकाणी गणेशोत्सव काळातही कारवाई केली होती. मात्र, तरीदेखील जुगाऱ्यांवर काहीही परिणाम होत नसल्याचे चित्र या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
हेही वाचा -हैदराबाद बलात्कार,खून प्रकरण; पीडितेचे नाव बदलून केले 'जस्टिस फॉर दिशा'
आरोपींकडून नगद 41 हजार 580 रुपये, 8 मोबाईल असा 1 लाख 3 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली. तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.