हिंगोली - येथील स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने विनापरवाना स्फोटके आणि डेटोनेटर जप्त करण्यात आले आहे. कळमनुरी तालुक्यातील बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत दाती शिवारात हा छापा टाकण्यात आला. संभारावर रामा भालेराव (वय - 45, रा. पुसद) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथके सतर्क झाले आहे. मटका, जुगार, अवैध दारू यावर हे पथक नजर ठेवून आहे. बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील जाती शिवारात स्फोटके दाखल होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना मिळाली होती. त्यानुसार परिसरात पथकाने छापा टाकला. या कारवाईत विनापरवाना 200 तोटे 189 देतो मॅटर आणि कोटक कांड्या जप्त करण्यात आल्या. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.