महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लेक असावी तर अशी! चिमुकली वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शिवते 'चपला-जोडे' - चिमुकली

अंजली शाळेतून येऊन, पाठीवरचे दप्तर बाजूला ठेऊन आपल्या वडिलांना मदत करते. हे चिमुकले हात काम करताना पाहून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांनाही चिमुकलीचे मोठे कौतुक वाटते.

अंजली

By

Published : Feb 16, 2019, 10:05 AM IST

हिंगोली- आजही अनेक कुटुंबांमध्ये आठराविश्व दारिद्र्य आहे. त्याला कारणेही भरपूर असतात. असेच एक कुटुंब गरिबीत जीवन जगत आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी कुटुंबातील मुलगी शाळेतून परतल्यानंतर पाठीवरचे दप्तर बाजूला ठेऊन आपल्या वडिलांना मदत करते. हे चिमुकले हात काम करताना पाहून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांनाही चिमुकलीचे मोठे कौतुक वाटते.

वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मोचीचे काम

अंजली संतोष ईरसे (१०) असे या चिमुकलीचे नाव आहे. अंजलीला ३ बहिणी आणि २ भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. अंजली ही तिसऱ्या क्रमांकाची मुलगी असून ती जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीमध्ये शिकत आहे. अंजलीचे वडील चपला-जोडे बनवण्याचा व्यवसाय आहे. शाळेजवळच रस्त्याच्या कडेला पोते टाकून उन्हापासून बचाव व्हावा, म्हणून छत्री लावली आहे. एका लहानशा पेटीत चपला जोडे बनवण्याचे साहित्य आहे.

या ठिकाणी चप्पल सांदायला, बुटाची पॅालीश करण्यासाठी ग्राहकांची ये-जा सुरू असते. अंजली अगदी लहानपणापासूनच शाळा सुटली, की आपल्या वडिलांचे काम अगदी बारकाईने न्याहळत असे. वडिलांचे पाहून तीने हळूहळू काम करण्यासही सुरुवात केली. शाळा सुटली की ती वडिलांजवळ जाऊन बसते. तिच्यापेक्षा मोठे असलेले व लहान बहीण-भाऊ मात्र शाळा सुटली की थेट घरी जातात. मात्र, अंजली या ठिकाणी काम करते.

अंजली अगदी मन लावून जोडे शिवणे, चप्पल शिवणे, कधी जोड्याला खिळे मारणे, पॅालीश करणे, अशी सर्वच कामे ती करते. त्यामुळे आता ४ पैसेही जास्त येऊ लागले आहेत. चिमुकली काम करत असल्याचे पाहून शक्यतो ग्राहक येथेच धाव घेतात. घरची परिस्थिती सुधारण्यास अंजलीची मदत झाली, असे वडील संतोष यांनी सांगितले. अंजली रोज आपल्या वडिलांना कामात मदत करत असल्याचे परिसरातील दुकानदारही मोठ्या कुतुहलाने सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details