हिंगोली- आज जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. देशासह राज्यात विविध ठिकाणी पहाटेपासूनच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योग गुरू योगाचे धडे देत योगाचे महत्त्वही सांगत आहेत. हिंगोली जिल्ह्यातही जागोजागी आयोजित केलेल्या योग शिबिरात राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हिंगोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा - योग
आंतरराष्ट्रीय योग दिवस योगदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जागोजागी आयोजित केलेल्या योग शिबिरात राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हिंगोलीमध्ये मागील तीन ते चार दिवसापासून आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी सुरू होती. विशेष म्हणजे पतंजली संघटनेच्यावतीने योग शिबिराची जनजागृतीही मोठ्या प्रमाणात केली जात होती. आज पहाटे राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांनी एनटीसी परिसरातील मैदानावर गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. योग गुरूंनी योगाचे धडे देत त्याचे महत्त्व समजावून सांगितले.
एनटीसी भागात आयोजित केलेल्या योग शिबिरास भाजप आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, नगरपालिका अध्यक्ष बाबाराव बांगर, तहसीलदार गजानन शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुमोड, माजी खासदार शिवाजी माने, क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, किशोर पाठक, संजय बेतेवार, चंदा रावळकर, दत्तराव लेकुळे यांच्यासह पतंजली संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मंडळींनी देखील जागतिक योग दिन साजरा केला.