महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत उपचाराच्या आरोप-प्रत्यारोपानंतर कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू - पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये उपचार घेत होते. मात्र, या ठिकाणी आजारा नुसार उपचार होत नसल्याचा आरोप इंगोले यांनी केला होता. एवढेच नाही तर तशा आशयाची ऑडिओ क्लिप देखील समाज माध्यमात व्हायरल झाली होती. या प्रकारने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. याचीच दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.

पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु
पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु

By

Published : Apr 29, 2021, 6:55 PM IST

हिंगोली - जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर आज (गुरूवार) मृत्यूझाला आहे. दोन दिवसांपूर्वीच या पोलीस कर्मचाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात त्याने रुग्णालयात उपचारासाठी होत असलेला हलगर्जीपणा सांगितला होता. एवढेच नाही तर डॉक्टर आजार वेगळा आणि उपचार दुसराच करीत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी कोविड केअर सेंटर उभारले होते. मात्र, या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या प्रयत्नांना देखील अपयश आले आहे. या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सचिन इंगोले असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते गेल्या काही दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये उपचार घेत होते. मात्र, या ठिकाणी आजारानुसार उपचार होत नसल्याचा आरोप इंगोले यांनी केला होता. एवढेच नाही तर तशा आशयाची ऑडिओ क्लिप देखील समाज माध्यमात व्हायरल झाली होती. या प्रकारने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. याचीच दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. अशातच या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात पुन्हा गोंधळ उडाला आहे.

योग्य उपचार होत असल्याचे डॉक्टरांची स्पष्टोक्ती

कोरोनाबाधित रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार सुरू असल्याचे डॉक्टर सांगत होते. एवढेच नाही तर व्हायरल ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने पोलीस विभागाकडून उपचार पद्धतीची चौकशी देखील केली जात होती. मात्र, चौकशी सुरू असतानाच पोलीस अधिकाऱ्याचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details