हिंगोली -लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात अनेक मतदार मोठ्या हिरिरीने सहभागी झाले आहेत. सध्या सोयाबीनचा हंगाम जोरात सुरू असल्याने सेनगाव तालुक्यातील जांभरून आंध या ठिकाणी सायंकाळी उशिरा मतदार मतदान केंद्रावर पोहोचले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच होती. साधारणता साडे नऊ ते दहा पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे.
हिंगोलीतील सोनगाव विधानसभा मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया - Hingoli AssemblyElection2019
हिंगोली जिल्ह्यातील सोनगाव तालुक्यातील जांभरून आंध या ठिकामी सांयकाळी उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. ही प्रक्रिया साधारण रात्री नऊ ते दहा पर्यंत सुरू होती.
सध्या सोयाबीनचा हंगाम जोरात सुरू आहे शेतमजूर रात्रंदिवस एक करत सोयाबीन काढण्याचे काम करून घेत आहेत. अधून-मधून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकरी निसर्गासमोर पूर्णता हतबल झाले आहेत. आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सवात देखील शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी बंद ठेवली नाही. सोयाबीनचे काम आटोपून शेतकरी थेट मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, मतदारांची संख्या 100 पेक्षा जास्त असल्याने, मतदानाची वेळ होऊनही मतदान प्रक्रिया सुरूच ठेवली होती. मतदान केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने, रात्रीचा दिवसच झाल्याचा भास होत होता. मात्र, येथील प्रक्रिया उशिरापर्यंत सुरूच असल्याने, प्रशासन चांगलेच ताटकळले होते. लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल एवढेच निवडणूक विभागातर्फे सांगितले जात होते. या मतदारसंघात उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे हिंगोली विधानसभा मतदारसंघात किती मतदान झाले याचा अंदाज लागत नव्हता इतर दोन मतदार संघात मात्र प्रक्रिया पूर्ण झाली आहे.