हिंगोली - सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. बियर बार, दारू, वाईन शॉप बंद असल्याने, तळीराम दारूची सवय गावठी दारू घेऊन पूर्ण करत आहेत. याचा फायदा घेत जिल्ह्यातील विविध भागात गावठी दारू काढली जात आहे. हिंगोली शहरातील महादेव वाडी भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात एक लाख रुपयांचा हजारो लिटर दारूसाठा नष्ट केला.
लॉकडाऊनमध्ये गावठी दारूची सर्रास विक्री; स्थानिक गुन्हे शाखेचा छापा - hingoli police
हिंगोली शहरातील महादेव वाडी भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात एक लाख रुपयांचा हजारो लिटर दारूसाठा नष्ट केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त आहे. लॉकडाऊन परिस्थितीतही जिल्ह्यात गावठी हातभट्टी दारूचा सर्रासपणे वापर वाढला आहे. यावर स्थानिक गुन्हे शाखा बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने हिंगोली शहरातील महादेव वाडी भागात एका अवैध दारू साठ्यावर छापा टाकला. यामध्ये एक लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गावठी दारू काढण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन नष्ट केले. अचानक करण्यात आलेल्या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.