हिंगोली - वन्यप्राण्यांच्या संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तसेच जैवविविधतेचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतानाचा रविवारी हिंगोली तालुक्यातील जामठी खुर्द परिसरात एका वन्य प्राण्याची शिकार करताना शिकारी आढळून आले. वनरक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेताच शिकाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ ठोकला. प्राण्याचे मांस वनविभागाने प्रयोगशाळेत प्राण्याची ओळख पटण्यासाठी पाठवले आहे. दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
हेही वाचा - बैलाने लाथ मारल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; मोहगाव येथील खळबळजनक घटना
रविवारी दुपारच्या वेळेस चार ते पाच शिकारी एका वन्यप्राण्याची शिकार करून मांस वेगवेगळे करत बसले होते, तर काही जण तीक्ष्ण हत्याराने मांस तोडत होते. तोच वनरक्षकांना ही गोष्ट कळताच सर्वजण पळून गेले. घटनास्थळावरून मांस, जाळे आदी साहित्य जप्त केले आहे. संबंधीत मांसाचे पशुवैद्यकीय अधिकाऱयामार्फत शेवविच्छेदन करून यातील काही मांसाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. अहवालानंतरच हे नेमके कोणत्या वन्यप्राण्यांचे मांस आहे हे सिद्ध होणार असल्याचे वनाधिकारी विश्वनाथ टाक यांनी सांगितले.