हिंगोली - वसमत तालुक्यातील कुरुंदा गिरगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी ( heavy unseasonal rains in hingoli ) लावली. या पावसात उभी असलेली केळी क्षणात आडवी पडल्याने या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न क्षणात भंगले ( Huge losses to banana growers ) आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी प्रशासन स्तरावर करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे ( Tehsildar Arvind Bolange ) यांनी दिली.
केळी झाली आडवी - वसमत तालुक्यातील गिरगाव कुरुंदा यासह आदी भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने केळीचे उत्पादन सर्वाधिक जास्त घेतले जाते. यातून लाखो रुपयाचा नफा देखील मिळतो. परंतु, यंदाही पहिल्याच पावसामुळे केळीचे पीक हे आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खरंतर लहानाचे मोठे केळीचे पीक करताना शेतकऱ्यांच्या अक्षरशा नाकीनऊ येतात. मात्र, मान्सून पूर्व हजेरी लावलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले केळीचे पीक हे निसर्गाने हिरावून घेतले आहे. याच केळीच्या पिकावर शेतकऱ्यांनी भविष्यातील स्वप्ने रंगविण्यास सुरुवात केली होती. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या नजरेतून केळी झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरल्या गत झाले आहे.