महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालकाचा निर्दयीपणा, मृत घोड्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी टाकले रस्त्याच्या कडेला

काही लोक किती मतलबी आणि निर्दयी असतात याचे चित्र एका मृत घोड्याच्या निर्दयी मालकावरून समोर आले आहे. ज्या घोड्याने आपल्या मालकाचे आयुष्यभर ओझे वाहिले, त्याच घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी या मालकाने त्याला रस्त्याच्या कडेला टाकून दिले.

मृत घोड्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी टाकले रस्त्याच्या कडेला

By

Published : Jun 2, 2019, 11:05 AM IST

हिंगोली - पाळीव प्राण्यांना आपण अत्यंत प्रेमाने सांभाळतो. यावर तेही आपल्यावर अत्यंत प्रेम करू लागतात. मात्र, काही लोक किती मतलबी आणि निर्दयी असतात याचे चित्र एका मृत घोड्याच्या निर्दयी मालकावरून समोर आले आहे. ज्या घोड्याने आपल्या मालकाचे आयुष्यभर ओझे वाहिले, त्याच घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी या मालकाने त्याला रस्त्याच्या कडेला टाकून दिले.

हा घोडा जेथे टाकण्यात आला आहे, त्या परिसरात आता दुर्गंधी सुटली आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना याचा अत्यंत त्रास होत आहे. याहूनही भयानक गोष्ट म्हणजे कुत्री या मृत घोड्याचे लचके तोडताना दिसत आहेत. येथे कुत्र्यांची संख्या वाढल्याने अपघात घडण्याचीही शक्यता आहे.

अश्मयुगापासून ते आजच्या प्रगत युगापर्यंत मानवाने प्रगतीचा जो काही आलेख वाढविला आहे त्या आलेखात मानवाला विविध प्राण्यांची विशेषतः पाळीव प्राण्यांची अत्यंत मदत झाली आहे. समाजशिल असलेल्या मानवाने पाळीव प्राण्यांना आपलेसे करून त्यांना लळा लावला. यातून त्याने आपल्या सुविधांसाठी त्याचा पाहिजे तसा उपयोगही करून घेतला. याच वर्षानुवर्षाच्या ऋणानुबंधनामुळे बरीचशी प्राणी माणसाळलीदेखील. यातून आपले सर्वस्व विसरून मालकाप्रती हे प्राणी निस्वार्थपणे सेवा बजावत असतात. मात्र, माणूस हा नेहमीकरिता व्यावहारिकच असतो. हे दिसून आले आहे, मृतावस्थेत हिंगोली-ओंढा रस्त्यावरील बोरजा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मृत घोड्यावरून.

मागील ४ ते ५ दिवसांपूर्वी या घोड्याचा मृत्यू झाला असावा. यासंदर्भात संबंधित विभागाने सदरील घोड्याच्या निर्दयी मालकाचा शोध घ्यावा आणि घोड्याची शेवटच्या क्षणी अशाप्रकारे हेळसांड केल्याने त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details