हिंगोली - हा माझा विजय नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. या हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदाराने बेईमानाला झिडकारून सत्याचा विजय केला आहे. त्यामुळे या मतदार संघातील मतदारांचा विकास मी निश्चित करणार आहे. ज्या काही या जिल्ह्याच्या समस्या असतील त्या समस्या निश्चितच सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास अजिबात तडा जाऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
मतदारांनी बेईमानाला झिडकारले, विजयी उमेदवार हेमंत पाटील - rejected
हेमंत पाटील यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते थांबले आहेत. रेकॉर्ड ब्रेक निकाल लागला आहे. सुरुवातीपासून हेमंत पाटील हे आघाडीवर होते. त्यांची लीड कमी झालीच नाही. वंचितचा फटका बसण्याची चिन्हे होती. मात्र, वंचितचा काहीही परिणाम झालेला नाही.
हिंगोली जिल्ह्यात मुख्य असलेला पाणी सिंचन प्रश्न मार्गी लावून अधोगिक वसाहतीचा ही विकास करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी प्रश्न तर सुटेलच त्याहूनही हिंगोलीतील रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. जनतेने दाखवलेला विश्वास अजिबात कमी होऊ देणार नाही.