हिंगोली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंगोली जिल्ह्यात 9 वाजल्यापासून 9 मिनिटापर्यंत लाईट बंद करून दिवे लावण्यात आले. सोबतच काही कुटुंबानी तर परातीही वाजविल्या, शिवाय फटाक्यांचीही आतषबाजी करण्यात आल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे सव्वा नऊ वाजेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती.
हिंगोली जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद - LAMP IN HINGOLI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याचे आवाहन केले, तेव्हापासून दिवे खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. तर काहींनी मात्र दिवाळीसाठी आणलेले दिवे आजच्या दिवशी बाहेर काढले.
हिंगोली जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याचे आवाहन केले, तेव्हापासून दिवे खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. तर काहींनी मात्र दिवाळीसाठी आणलेले दिवे आजच्या दिवशी बाहेर काढले. काही कुटुंबांनी मेणबत्या लावल्या. तर काही कुटुंबांनी मोबाईलच्या फ्लॅशलाईट लावल्याचे पहावयास मिळाले. मात्र, एखाद्या सणाप्रमाणे फटाक्यांचा आवाज सुरूच होता. काही कुटुंबांनी मात्र दिवे लावणे काही योग्य समजले नाही.