महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जुळवाजुळव सुरू - hingoli zp president election

राज्यात नव्याने महाविकासआघाडी साकारण्याची स्वप्न पाहिले जात होते. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मनोमिलन झाले. जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी अडीच वर्षापुर्वीच साकारलेली असली तरी वरिष्ठ स्तरावरील बदलाने जिल्हा परिषदेतही बदल होण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्हा परिषद

By

Published : Nov 23, 2019, 8:17 PM IST

हिंगोली -राज्यात नव्याने महाविकासआघाडी साकारण्याची स्वप्न पाहिले जात होते. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मनोमिलन झाले. जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी अडीच वर्षापुर्वीच साकारलेली असली तरी वरीष्ठ स्तरावरील बदलाने जिल्हा परिषदेतही बदल होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद हे पहिल्यांदाच शिवसेनेने भूषविले आहे. तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने दोन सभापती पदे मिळवली आहेत. यावेळी मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसुचित जमातीसाठी असून, अध्यक्षपदासाठीची जुळवाजुळव जोरात सुरू आहे.

हेही वाचा - अखेर 'तेच' झालं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच अभिनंदन - प्रकाश जावडेकर

अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री पदासाठीची सुरू असलेली रस्सीखेच शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथेमुळे संपुष्टात आली आहे. राज्यातील शिवसेना-भाजपमधील तणाव लक्षात घेता महाविकासआघाडीला पुन्हा बळकटी येते की काय? अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडे जोरदार मोर्चेबांधणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसकडे अध्यक्षपदासाठी डॉ. सतीश पाचपुते प्रबळ दावेदार असून बाजीराव जुमडे, चंद्रभागा जाधव असे 3 उमेदवार आहेत.

शिवसेनेकडे गणाजी बेले, राष्ट्रवादीकडे रामराव वाघडव आणी भाजपाकडे कल्पना घोगरे, जनाबाई माहुरे असे 2 उमेदवार अध्यपदासाठी इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत शिवसेनेचे 15 सदस्य असून काँग्रेसचे 11, राष्ट्रवादीचे 12, भाजपाचे 11 तर 3 अपक्ष आहेत. सद्यस्थितीत महाविकासआघाडी 38 असे संख्याबळ आहे. अपक्षांना सोबत घेऊन सेना-भाजपा एकत्रित येतात की, पुन्हा महाशिवआघाडी एकत्रितपणे सत्ता स्थापन करेल? यावर बरेच काही अवलंबुन आहे. परंतू शिवसेना-भाजपामधील दुभंगलेली युती पहाता जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या भुमिकेकडे निर्णायक दृष्टीने पाहिले जात आहे. शेवटी माळ कोणाच्या गळ्यात पडेल कोणाचे पारडे जड होईल याकडे आता लक्ष लागले आहे.

हेही वाचा - मी अजित पवारांसोबतच... राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार अनिल पाटलांचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details