महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..अखेर त्या झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार हक्काची शाळा! - हिंगोली युवा सेना घोरदरी शाळा

सेनगाव तालुक्यातील घोरदरी गावापासून मुंगसाजी नगर हे अवघे चार ते पाच किलोमीटर आहे. मात्र या शाळेत जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास हा कोणत्या दिव्याहून कमी नाही. काट्याकुट्यातून, शेताच्या कडेला असलेल्या ओढ्यातून मार्ग काढत ही शाळा गाठावी लागते. मात्र अशा भयंकर परिस्थितीत अविरतपणे येथील दोन शिक्षक या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात.

Hingoli Yuva Sena helps to build school building
युवा सेनेच्या मदतीने झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार हक्काची शाळा!

By

Published : Jan 11, 2020, 2:59 AM IST

हिंगोली- आजही बऱ्याच ग्रामीण भागांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठी दुरवस्था आहे. हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यात असलेल्या मुंगसाजी नगर येथील शाळेची गत मात्र वाईटाहून वाईट आहे. ही वस्ती शाळा चक्क एका झोपडीत भरते. ही खळबळजनक बाब विविध माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे.

युवा सेनेच्या मदतीने झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार हक्काची शाळा!

शाळेत जाण्यासाठी करावा लागतो खडतर प्रवास..

सेनगाव तालुक्यतील घोरदरी गावापासून मुंगसाजी नगर हे अवघे चार ते पाच किलोमीटर आहे. मात्र या शाळेत जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास हा कोणत्या दिव्याहून कमी नाही. काट्याकुट्यातून, शेताच्या कडेला असलेल्या ओढ्यातून मार्ग काढत ही शाळा गाठावी लागते. मात्र अशा भयंकर परिस्थितीत अविरतपणे येथील दोन शिक्षक या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात.

युवासेनेने दिलेले आश्वासन पाळले..

या शाळेला युवासेना प्रमुख यांनी कार्यकर्त्यांसह मुंगसाजी नगर येथे पायपीट करत जाऊन भेट दिली. यापूर्वी शिवसेना तालुका प्रमुख संदेश देशमुख यांनीही या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना उबदार कपडे दिले होते. त्याच वेळी त्यांनी या ठिकाणी वर्ग खोली उभारून देण्यासाठी निश्चित सेना प्रयत्न करेल असे अश्वासन दिले होते. अन् तेच आश्वासन पूर्ण करत, युवा सेना प्रमुख दिलीप घुगे यांनी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन केले.

शिक्षण विभागही करत आहे इमारत उभारण्यासाठी प्रयत्न..

जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागदेखील या चिमुकल्यांना त्यांच्या हक्काची शाळा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, येथील जमीन वनविभागाच्या ताब्यात असल्यामुळे, त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागत आहे.

दरम्यान, कोणत्या ना कोणत्या प्रकारे या चिमुकल्यांसाठी मदतीचा हात पुढे येत असल्यामुळे, पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच माध्यमांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी माध्यमांचेही आभार मानले आहेत. युवा सेनेने केलेल्या मदतीमुळे, झोपडीत शिक्षण घेणारे हे चिमुकले काही दिवसांमध्येच आपल्या हक्काच्या इमारतीमध्ये शिक्षण घेतील.

हेही वाचा : #CAA #NRC आणि #NPR विरोधात २४ जानेवारीला महारॅली; शरद पवार करणार नेतृत्व

ABOUT THE AUTHOR

...view details