महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आई ओबीसी, वडील मराठा.. तर माझी जात कोणती? तरुणाचा मुख्यमंत्र्यांना सवाल - cast issue

पतंगे यांची आई ही विदर्भातील असून, त्यांची जात ही ओबीसी आहे. तर वडील हे मराठवाड्यातील आहेत. त्यांची जात मराठा आहे. मात्र, त्यांना जातीचे प्रमाणपत्रही मिळत नाही. मग जातीचे प्रमाणपत्रच मिळत नसेल तर माझ्या आई वडिलांचा आंतरजातीय विवाह का समजला जात नाही, असा सवाल या तरुणाने मुख्यमंत्र्यांना केला आहे. त्यामुळे सध्या हे पत्र चांगलेच चर्चेत आले आहे.

तर माझी जात कोणती? तरुणाचा मुख्यमंत्र्यांना सवाल
तर माझी जात कोणती? तरुणाचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By

Published : Jun 9, 2021, 7:23 AM IST

हिंगोली- सध्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून संपूर्ण वातावरण तापलेले आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने, सकल मराठा समाजात नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळेच हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथील एका तरुणाने मुख्यमंत्र्याला निवेदन देत निदान माझी जात आहे तरी कोणती? असा प्रश्न केला आहे. जातीची विचारणा करणाऱ्या या निवदेनाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे. नामदेव पतंगे (रा. ताकतोडा) असे या जात विचारणाऱ्या तरुणाचे आहे

तर माझी जात कोणती? तरुणाचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पतंगे हा नेहमीच वेगवेगळ्या लक्षवेधी मागण्या मुख्यमंत्र्याकडे करत असतो. सध्या आरक्षण मुद्दा गाजत असल्याने, पतंगे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांचे मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री साहेब निदान माझी जात नेमकी आहे तरी कोणती? ती मला द्या अशी मागणी त्याने केली आहे. सेनगाव तहसीलदारा मार्फत यामागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

मग माझ्या आई वडिलांचा अंतर जातीय विवाह का नाही ?

पतंगे यांची आई ही विदर्भातील असून, त्यांची जात ही ओबीसी आहे. तर वडील हे मराठवाड्यातील आहेत. त्यांची जात मराठा आहे. मात्र, त्यांना जातीचे प्रमाणपत्रही मिळत नाही. मग जातीचे प्रमाणपत्रच मिळत नसेल तर माझ्या आई वडिलांचा आंतरजातीय विवाह का समजला जात नाही, असा सवाल या तरुणाने मुख्यमंत्र्यांना केला आहे. त्यामुळे सध्या हे पत्र चांगलेच चर्चेत आले आहे.

भाजप सरकारने आरक्षणासाठी एक समिती गठीत करत घटनेत दुरुस्ती करून आर्थिक निकषांवर मराठा समाजाला ईडब्लूएस मधून सोळा टक्के आरक्षण दिले होते. परंतु 50 टक्क्यांची मर्यादा आल्याने या भूमिकेविरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे सकल मराठा समाज यांनी संपूर्ण राज्यात सर्वोच्च न्यायालयाचा निषेध केलाय.

तरुण नेहमीच वेधतोय महाराष्ट्र

नामदेव पतंगे हा तरुण नेहमीच मुख्यमंत्र्याकडे वेगवेगळ्या प्रश्नांवर मागण्या करत राहतो. विशेष म्हणजे अशाप्रकारे आगळेवेगळे निवेदन करून तो संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. यापूर्वीही त्याने अनेकदा आपल्या मागण्यातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय. कधी पीक बरोबर आले नाही तर कधी पीक कर्ज , पीक विमा, दिवाळी साजरी करता आली नाही असे एक ना अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मांडत राहतो. आता आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याने त्याने जातीची विचारणा करणारे हे निवेदन दिले आहे. आता नेमकं मुख्यमंत्री महोदय या तरुणाच्या पत्राला नेमकं काय उत्तर देतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details