हिंगोली - जवान म्हटले की कोणतीही काम धाडसीपणाने झेलावे लागते. त्यासाठी तसे प्रशिक्षणदेखील मिळाल्याने त्याला कोणतेही काम अजिबात अशक्य वाटत नाही. सैन्यात आणि पोलीस दलात वरिष्ठांच्या सूचनांचा खूप आदर केला जातो. त्यांची कमांड म्हणजे जवांनांसाठी सर्व काही असते. हिंगोली येथील राज्य राखीव दल बल गट क्रमांक 12 येथुन दोन तुकड्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्त करण्यासाठी रवाना झाल्या होत्या. कोरोनाच्या या महासंकटात जवानही सर्व काळजी घेत होते. मात्र, तरीदेखील राज्य राखीव दलाच्या काही काही जवांनाना कोरोनाची लागण झाली. यात पोलीस निरीक्षक संजय तिडके, जवान संदीप सुपे, तात्याराव खडके यांचा समावेश आहे. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना त्यांनी आपला कोरोनानुभव कथन केला.
मालेगावात कोरोनाची तर नुकतीच सुरुवात झाली होती. यामुळे वरिष्ठांच्या कमांडनुसारच आमची तुकडी मालेगाव येथे कोरोनाच्या या महासंकटात बंदोबस्तासाठी रवाना झाली होती. तिथपर्यंत खूप आनंदात पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर स्वतःला झोकून देत खुप काम केले. रस्त्यावर रात्रभर उभे राहून बंदोबस्त करत कर्तव्य पार पाडले. कोरोनाचे संकट होते. मात्र, तितकी त्याच्याविषयी काही माहिती नव्हती. तरीही आम्ही फार काळजी घ्यायचो. रस्त्यावर उभे राहून कर्तव्ये बजावले जात होतो. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत कर्तव्य पार पडले जात होते. अनेक ग्रामीण भागात सॅनिटायझर आणि आदी जीवनावश्यक वस्तू देखील पोहोचविल्या जात होत्या. हे काम करीत असताना समोरील गरजवंतांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून या जवांनाचा थकवा दूर व्हायचा. यानंतर ते दुसऱ्या कामाकडे वळत असे. एकंदरीतच दिवसरात्र सुरू असलेले काम अखंडित सुरू होते. मात्र, तेथून परत आल्यावर आम्हीच कोरोना पॉझिटिव्ह निघालो. यामुळे आम्ही हादरलो होतो. मात्र, तरीही स्वत:ला सावरले, असा अनुभव या जवांनांनी कथन केला.
आपल्याला कोरोना होईल याची जराही कल्पना नव्हती. यानंतर आपल्या जिल्ह्यात परतण्याची वेळ आली होती. यानुसार मुंबई आणि मालेगाव येथील टीम एक पाठोपाठ हिंगोलीत दाखल झाल्या. जवान म्हणाले, सर्व प्रथम आम्ही ज्या तुकडी मध्ये होतो ती मालेगावची तुकडी हिंगोलीत दाखल झाली. यावेळी समादेशक मंचक इप्पर यांनी आम्ही वाहनातून उतरल्यानंतर होतो याचवेळी आम्हाला खबरदारीचा उपाय म्हणून अलगीकरण कक्षात दाखल केले. याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. विचारायचे धाडस कोणीच ही करत नव्हते. शेवटी आरोग्य पथक दाखल होऊन आमचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली. यानंतर मात्र, आमची भीती वाढायला लागली होती. आमच्यातील एक एकाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ही भीती आणखी वाढायला लागली होती. मात्र, आम्हाला वरिष्ठ वेळोवेळी धीर देण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे थोडा धीर वाटत होता.
- कुटुंबाना कोणतीच कल्पना दिली नाही -