हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस अक्षरशः कहरच होत चालला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा चांगलीच गोंधळली असून, आतापर्यंत सर्वच जवानांचे अतिशय बारकाईने नियोजन करून, त्यांच्या प्रकृतीची क्षणा क्षणाला विचारपूस करणारे राज्य राखीव दलाचे समादेशक मंचक ईप्पर यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती खलावल्याने त्याना उपचारासाठी तातडीने हैदराबाद येथे हलविण्यात आले आहे. आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती समादेशक ईप्पर यांनी दिली आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
इतर जिल्ह्याच्या पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात ही कोरोनाचा प्रताप वाढलेला आहे. जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाची लागण झालेली होती. जिल्ह्यात सुरुवात ही सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यलयापासून होऊन, नंतर इतर कार्यालयात ही कोरोना पोहोचला. एवढेच काय तर जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्यधिकारी, निवासी वैधकीय अधिकारी आदी अधिकारी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. आशा परिस्थितीत परजिल्ह्यात बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांचे जिल्ह्यात आगमन होताच, त्यांचे स्वॅब घेणे, कोरोनाबाधित आढळलेल्या जवानांना चांगले उपचार मिळावेत म्हणून रात्रंदिवस धडपणारे हिंगोली येथील राज्य रखीव दलाचे समादेशक मंचक ईप्पर यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील रक्षक, चालक, अन कार्यालयातील इतर ही कर्मचारी क्वारंटाईन केले आहेत.
कोरोनाचा कहर सुरुच; राज्य राखीव दलाचे समादेशक ही पॉझिटिव्ह - hingoli srp officer corona positive news
जिल्ह्यात सुरुवात ही सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यलयापासून होऊन, नंतर इतर कार्यालयात ही कोरोना पोहोचला. एवढेच काय तर जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्यधिकारी, निवासी वैधकीय अधिकारी आदी अधिकारी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे. आशा परिस्थितीत परजिल्ह्यात बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांचे जिल्ह्यात आगमन होताच, त्यांचे स्वॅब घेणे, कोरोनाबाधित आढळलेल्या जवानांना चांगले उपचार मिळावेत म्हणून रात्रंदिवस धडपणारे हिंगोली येथील राज्य रखीव दलाचे समादेशक मंचक ईप्पर यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
राज्य राखीव दलाचे समादेशक मंचक ईप्पर
अमदेश ईप्पर यांना उपचारासाठी हैदराबाद येथील यशोदा रुग्णलायात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या प्रकृती स्थिर आहे. तर परजिल्ह्यात बंदोबस्त करण्यासाठी गेल्या दोन तुकड्या परतणार आहेत, त्यातील जवानांचे ही प्रशासनाच्या वतीने स्वॅब घेण्यात येणार आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात परत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या 1हजार 700 चा आकडा पार केला असून, यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.