महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत इंधन दरवाढीचा, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध - हिंगोलीत रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तसेच शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

हिंगोली
हिंगोली

By

Published : Dec 12, 2020, 5:05 PM IST

हिंगोली- दिवसेंदिवस होत असलेली पेट्रोल दरवाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. यातून फार मोठे नुकसान होत चालले आहे. अगोदरच कोरोनाने हैराण झालेल्यांना या पेट्रोल-डिझेल दर वाढीने भांबावून सोडले आहे. दरवाढीचा तसेच शेतकरी आंदोलनाविषयी वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध शिवसेनेच्या वतीने केला.

हिंगोली

दिल्ली व देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर रावसाहेब दानवे यांनी, हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून त्यांच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याचा हिंगोली येथे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना स्टाईलने निषेध केला.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

दिवसेंदिवस होत असलेली पेट्रोल दरवाढ ही सर्वसामान्यांना चांगलीच अडचणीत आणत आहे. आज घडीला प्रत्येकजण अडचणीत असताना पेट्रोल दरवाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचा निश्चितच फटका वाहनधारकांना बसला आहे. त्यामुळे ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. ही वाढ कमी न झाल्यास याहुनही पुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा आमदार बांगर यांनी दिला. पेट्रोल अन् डिझेल दरवाढीचा निषेध करीत केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी करून दुचाकी हात गाडीमध्ये घालून मिरवणूक काढण्यात आली.

दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

शेतकरीविरोधी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये असंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत. मात्र, केंद्र सरकार त्या शेतकऱ्यांचे अजिबात काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. उलट त्या आंदोलकांना त्रास कसा होईल, यासाठी प्रयत्न करत आहे, असे आमदार म्हणाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. आंदोलनामध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details