हिंगोली- सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील मुंगसाजी नगरात कुडाच्या झोपडीत चिमुकले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे, त्याना तीनही ऋतूंचा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात 'ईटीव्ही भारत' ने बातमी प्रकाशित करताच शिवसेनेच्या वतीने चिमुकल्यांची भेट घेत त्याना स्वेटरचे वाटप करण्यात आले. तर, चिमुकल्यांना त्यांच्या हक्काची इमारत उभारून देण्याचे आश्वासनही शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिले.
जिल्ह्यातील घोरदरी येथील मुंगसाजी नगरातील चिमुकल्यांना हक्काची इमारत नाही. मात्र, मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून पालकांनी माळरानात एक झोपडी उभरली. आणि या मोडक्या तोडक्या झोपडीतच हे चिमुकले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र, इमारत नसल्याने चिमुकल्यांना ऊन, पाऊस आणि थंडीचा मारा सहन करावा लागयचा. शिवाय, शाळा गावापासून कोसो दूर असल्याने चिमुकल्यांना पायपीट करावी लागायची. थंडीच्या झळा सहन करतच चिमुकले शाळेत जायचे.