हिंगोली - औंढा ते वसमत या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान रस्त्यालगत नाले करण्यात आले नाहीत. मात्त्यार, दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्यावरचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे. त्यामुळे प्रशासनावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या मार्गावरील वाहतूक अडवली. त्यामुळे यामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून औंढा ते वसमत या रस्त्याचे काम सुरू आहे. पण या रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने नालेच ठेवले नाहीत. त्यात मागील तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी नाल्या नसल्याने थेट आजूबाजूच्या शेतात शिरले. खरीपाच्या पेरणीची तयारी करुन ठेवलेल्या शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले. पाण्यामुळे सुपिक गाळ वाहून गेला. तेव्हा शेतकऱ्यांनी रस्ता रोखला.