महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्राध्यापकांचा कावा, वर्षाताई अनुदान वितरणाची तारीख दावा - हिंगोली विनाअनुदानित शिक्षक मागणी

आजघडीला विनाअनुदानित शिक्षकांच्या घरची परिस्थिती एवढी बिकट होऊन झालेली आहे. अनुदान न मिळाल्याने अनेक शिक्षकांना शिक्षकी पेशा सोडून रोजगार उपलब्ध करण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. काही काही शिक्षक तर भाजीपाला विक्रीतून आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, त्यांच्या अनुदान मागणीकडे अजून कोणत्याही मंत्र्यांनी किवा प्रमुखांनी अजिबात लक्ष घातलेले नाही. त्यामुळे शिक्षक हे चांगले मेटाकुटीला आलेले आहेत.

hingoli professor demand to minister varsha gaikwad for give immediately grand
प्राध्यापकांचा कावा, वर्षाताई अनुदान वितरणाची तारीख दावा

By

Published : Oct 3, 2020, 8:23 PM IST

हिंगोली -नेहमीच प्राध्यापकांचा कावा आणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शिक्षकांचे प्रश्न अजूनही मार्गी लावलेले नाहीत. त्यातच विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. अनेकदा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक क.म.वी शाळा कृती संघटनेच्यावतीने अनेकदा वरिष्ठ स्तरावर निवेदने देखील दिली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. निवेदन देऊ- देऊ थकलेल्या शिक्षकांनी अखेर, शिक्षकांचा कावा असलेल्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी निदान अनुदान देण्याची तारीख दाखवावी ही मागणी जोर लावून धरलेली आहे. हीच मागणी घेऊन शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत.

प्राध्यापकांचा कावा, वर्षाताई अनुदान वितरणाची तारीख दावा

संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षक हे विविध मागण्यासाठी लढत आहेत. एवढेच नव्हे तर वरिष्ठ स्तरावर मागणी पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय आंदोलन देखील केले. जिल्ह्यात जो मंत्री येईल त्या मंत्र्याला आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदन दिले. मात्र, काहीही उपयोग झालेला नाही. आजघडीला विनाअनुदानित शिक्षकांच्या घरची परिस्थिती एवढी बिकट होऊन झालेली आहे. अनुदान न मिळाल्याने अनेक शिक्षकांना शिक्षकी पेशा सोडून रोजगार उपलब्ध करण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. काही काही शिक्षक तर भाजीपाला विक्रीतून आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, त्यांच्या अनुदान मागणीकडे अजून कोणत्याही मंत्र्यांनी किवा प्रमुखांनी अजिबात लक्ष घातलेले नाही. त्यामुळे शिक्षक हे चांगले मेटाकुटीला आलेले आहेत. शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा. यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक हे सोशल डिस्टन्सचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत.


शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे प्रत्येक दौऱ्यामध्ये शिक्षकांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दिलेले आहे. मात्र अजूनही शिक्षकांची कोणतीही मागणी पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे शिक्षकांवर फार वाईट वेळ या काळामध्ये येऊन ठेपलेल्या. शेवटी नाईलाजास्तव शिक्षकांनी मोठ्या पोटतिडकीने प्राध्यापकांचा कावा असलेल्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी निदान आता अनुदानाची तरी तारीख दाखवा, असे मोठ्या नम्रतेने मागणी केलेली आहे. आता खरोखरच ही मागणी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्ण करावी, एवढीच अपेक्षा आता शिक्षक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details