हिंगोली- आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांची मोठी समस्या निर्माण होऊन बसली आहे. अशा परिस्थितीत पोलीस रस्त्यावर कोणालाच निघू देत नाहीत, त्यामुळे प्रसूती माता, वयोवृध्द जोडपे, आजारी व्यक्ती यांना देखील फटका बसत आहे. मात्र, अशांसाठी आता हिंगोलीचे पोलिसांकडून रिक्षाची सुविधा मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमाचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या हस्ते उद्घाटन केले. ही रिक्षा 24 तास सेवेत राहणार आहेत. या रिक्षामध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी पडदे लावण्यात आले आहेत. रिक्षाचा उपयोग झाल्यानंतर प्रत्येक वेळी रिक्षा निर्जंतुक करण्यात येणार आहे.