हिंगोली -जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पुयनी या गावातील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बळीराम दशरथ चोपडे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
हिंगोलीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या; कारण अस्पष्ट - तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या
हिंगोली जिल्ह्यातील पुयनी या गावातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बळीराम दशरथ चोपडे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
रविवारी पहाटेच्या वेळी वसमत तालुक्यातील पुयनी या गावातील बळीराम दशरथ चोपडे, या तरुणाने आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर बळीरामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण अध्यापही समजू शकले नाही.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून आत्महत्येचे सत्र सुरू आहे. या अगोदरही स्वातंत्र्यदिनी एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.