महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हिंगोलीत राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात ही यात्रा येणार आहे. या पार्श्वभूमीवर या प्रदेशातील राजकीय हालचालींना चांगलीच गती आलेली दिसत आहे.

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हिंगोलीत राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता

By

Published : Aug 23, 2019, 12:36 PM IST

हिंगोली -जिल्ह्यात 30 ऑगस्टला मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. अनेक लहानमोठे कार्यकर्तेही मुख्यमंत्र्याच्या हस्ते गळ्यात माळ टाकून घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हिंगोलीत राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता

हिंगोली जिल्ह्यात महिनाभरापासून दबक्या आवाजात अनेकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत असली तरी मागील तीन ते चार दिवसापासून उघडपणे चर्चा होत आहेत. काही बड्या नेत्यांची नावानिशी चर्चा होताना दिसत आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची सर्वाधिक चर्चा होताना दिसते.

हिंगोली नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असले तरी अजून दोन नगरसेवकांसाठी भाजपची ओढाताण सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थीत होणारा हा बार खरा ठरणार की केवळ चर्चेचा फुसका बार ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

30 ऑगस्टला मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा हिंगोलीत दाखल होणार

भाजपचा "पाच वर्षपूर्ती मेळावा" सेनगाव येथे आयोजित

पाच वर्षात मतदारसंघात भाजपच्यावतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा या मेळाव्यात मांडला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अतुल सावे, राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल, प्रदेश प्रवक्ता गणेश हाके, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, संघटन मंत्री भाऊराव देशमुख आदी नेते उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात देखील अनेकजण भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details