महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत नवीन कोरोना रुग्णालय उभारण्याच्या हालचाली गतिमान

हिंगोली शहरातील औंढा-नागनाथ ते हिंगोली या मार्गावर असलेली अल्पसंख्याक वसतिगृहाची इमारत प्रशासनाने ताब्यात घेत कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केली आहे. या ठिकाणी एकूण पन्नास खोल्या असून, प्रत्येक खोलीत दोन कॉट टाकण्यात आले आहेत.

हिंगोलीत नवीन कोरोना रुग्णालय उभारण्याच्या हालचाली गतीमान
हिंगोलीत नवीन कोरोना रुग्णालय उभारण्याच्या हालचाली गतीमान

By

Published : Apr 24, 2020, 8:21 PM IST

हिंगोली - संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे रुग्ण हिंगोली जिल्ह्यातही आढळून आल्याने, हिंगोलीचे प्रशासन गतिमान झाले असल्याचे पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना संशयित रुग्णांची वाढती आकडेवारी बघता प्रशासनाच्या वतीने नवीन कोरोना रुग्णालय उभारण्याच्या हालचाली गतीने सुरू आहेत.

हिंगोलीत नवीन कोरोना रुग्णालय उभारण्याच्या हालचाली गतीमान
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोरोना वार्डमध्ये 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिवसेंदिवस कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे हिंगोली शहरातील औंढा-नागनाथ ते हिंगोली या मार्गावर असलेली अल्पसंख्याक वसतिगृहाची इमारत प्रशासनाने ताब्यात घेत कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केली आहे. या ठिकाणी एकूण पन्नास खोल्या असून, प्रत्येक खोलीत दोन कॉट टाकण्यात आले आहेत, तसेच व्हेंटिलेटरची व्यवस्था प्रत्येक खोलीत करणे सुरू आहे. शिवाय उपकरणे देखील गतीने बसविण्याचे काम सुरू आहे.

येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये हे रुग्णालय सज्ज होणार आहे. दरम्यान, हिंगोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि या नवीन रुग्णालयात कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली.

जिल्ह्यात आज घडीला सहा कोरोनाबाधित रुग्ण असून 332 रुग्णांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तर आयसोलेशन वार्डमध्ये 738 रुग्ण दाखल आहेत. प्रशासनाच्यावतीने विनाकाम बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर रस्त्यावर चोख पोलीस बंदोबस्त देखील आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details