हिंगोली- कोरोनाने मोठ-मोठे व्यापार ठप्प झालेत. अशात सर्व सामान्यांनासमोरही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, हिंगोली येथे अनेक दानशुरांनी नगर पालिकेकडे केलेली विविध प्रकारची मदत पालिका नियोजन पध्दतीने गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता अडचणीत सापडलेल्या होमगार्डपर्यंतही मदत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचवली गेली आहे. यामुळे, 135 होमगार्डच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडविला गेला आहे.
कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत हिंगोली नगरपालिका आली धावून, गरजूंना केली मदत
कोरोनासारख्या महाभयंकर संकटात अनेकांनी मदतीचा हात समोर केला आहे. विशेष करून हिंगोली नगरपालिकेचे सीओ रामदास पाटील यांनी विदारक परिस्थिती उद्धवण्यास सुरुवात होताच मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून नगर पालिकेकडे मदतीचा ओघ सुरू झाला असून, तो अजूनही कायम आहे. प्राप्त झालेल्या मदतीचे अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने वाटपही करण्यात आले.
कोरोनासारख्या महाभयंकर संकटात अनेकांनी मदतीचा हात समोर केला आहे. विशेष करून हिंगोली नगरपालिकेचे सीओ रामदास पाटील यांनी विदारक परिस्थिती उद्धवण्यास सुरुवात होताच मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून नगर पालिकेकडे मदतीचा ओघ सुरू झाला असून, तो अजूनही कायम आहे. प्राप्त झालेल्या मदतीचे अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने वाटपही करण्यात आले. शहरातील कानाकोपऱ्यात असलेल्या दिव्यांगाना कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच कीट देण्यात आले. यामध्ये दिवसरात्र राबणाऱ्या आशा वर्कर, नगरपालिका सफाई कामगार, गरजवंत आणि आता होमगार्डचीदेखील भूक भागवण्यासाठी पालिका समोर आली आहे.
आज घडीला 35 होमगार्डस पोलीस कर्मचाऱ्यांसोबत राबत आहेत. तर, 135 होमगार्ड अजून घरीच आहेत. कर्तव्यावर नसल्याने त्यांच्यासमोर जेवणाचाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र, नगरपालिका धावून आल्यानंतर काही प्रमाणात का होईना हा प्रश्न सुटण्यासाठी मदत झाली. पालिकेचे हे नियोजन पाहूनच खासदार हेमंत पाटील यांनी नगरपालिकेला भेट देऊन सीओ पाटील यांचे अभिनंदन केले.