हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे. तसेच, कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच, लॉकडाऊन असताना नागरिक घराबाहेर फिरताना दिसून येत आहे. त्यामुळे, सतर्क झालेल्या पालिकने शहरातील गल्लीबोळांचे निर्जंतुकीकरण आणि शहरातील रस्त्यांना धुण्यास सुरुवात केली आहे.
हिंगोली पालिकेने रस्त्यांना धुवून काढले; गल्ली बोळींचे केले निर्जंतुकीकरण - hingoli municipality
नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे कर्मचारी शहरातील मुख्य रस्ते पाण्याच्या साहाय्याने चकाचक धुऊन काढत आहेत. त्याचबरोबर, परिस्थितीचे गांभीर्य समजून नागरिकांनी घरीच राहवे, बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हिंगोली
नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे कर्मचारी शहरातील मुख्य रस्ते पाण्याच्या साहाय्याने धुवून काढत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शहरातील इंदिरा गांधी ते रिसाला मार्गावर पाणी मारण्यात आले. त्याचबरोबर, परिस्थितीचे गांभीर्य समजून नागरिकांनी घरीच राहवे, बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा-अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हिंगोलीकरांनी केली पुष्पवृष्टी
Last Updated : Apr 11, 2020, 2:19 PM IST