हिंगोली -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नगरपालिकेच्या वतीने दिवसरात्र एक करीत स्वच्छता करून शहराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. असे असले तरी मस्तानशहा नगरमध्ये काही जणांनी ट्रॅक्टरकडे धाव घेत तुम्ही केवळ पाण्याची फवारणी करीत आहेत, जनतेला वेड्यात काढत आहेत, असे म्हणून फवारणी करीत असलेल्या ट्रॅक्टर चालकला मारहाण केली. ही घटना 7 एप्रिलला रात्री 7 वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकाराने नगर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर कारवाई न झाल्यास संपूर्ण काम बंद ठेवण्याचा इशारा मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली नगरपालिकेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरण केले जात आहे. शहरातही दुसऱ्यांदा निर्जंतुकीकरण केले जात आहे. मस्तानशहा नगरमध्ये निर्जंतुकीकरण सुरू असताना तेथील काही युवकांनी ट्रॅक्टरकडे धाव घेऊन, तुम्ही कोणतेही औषध न टाकता साध्या पाण्याने फवारणी करून जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहेत. असे म्हणून ट्रॅक्टर चालक अफसर खा अहेमद खा पठाण यास सात ते आठ जणांनी शिवीगाळ करून पायावर मारहाण केली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी जमाव झाला. रात्री उशिरा नगर पालिका कर्मचाऱ्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पाण्याचीच फवारणी करत असल्याचे सांगत नगरपालिका कर्मचाऱ्यास मारहाण; कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा - hingoli corona update
मस्तानशहा नगरमध्ये निर्जंतुकीकरण सुरू असताना तेथील काही युवकांनी ट्रॅक्टरकडे धाव घेऊन, तुम्ही कोणतेही औषध न टाकता सध्या पाण्याने फवारणी करून जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहेत. असे म्हणून ट्रॅक्टर चालक अफसर खा अहेमद खा पठाण यास सात ते आठ जणांनी शिवीगाळ करून पायावर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
पाण्याचीच फवारणी करत असल्याचे सांगत नगरपालिका कर्मचाऱ्यास मारहाण; कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा
पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील हे शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तळ ठोकून होते. मात्र, या घटनेने दिवस रात्र एक करीत शहराची स्वच्छता करण्यासाठी धडपड करीत असलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला आहे.