महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली : अट्टल मोबाईल चोरट्यास अटक, 21 मोबाईल हस्तगत - मोबाईल चोरट्यास अटक

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने एका अट्टल मोबाईल चोरट्यास बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून महागडे 21 मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अजूनही त्याच्याकडून मोबाईल मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले.

mobiles-seized
mobiles-seized

By

Published : Feb 2, 2021, 9:54 PM IST

Updated : Feb 2, 2021, 10:01 PM IST

हिंगोली - दिवसेंदिवस मोबाईल वापरण्याची क्रेज वाढत चालली आहे. अशातच नवनवीन अँड्रॉइड मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाली असून हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने अशाच एका अट्टल मोबाईल चोरट्यास बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा एक मित्र जेलची हवा खात असून, दुसरा एक मित्र फरार आहे. तर ताब्यात घेतलेल्या अट्टल चोरट्याकडून महागडे 21 मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अजूनही त्याच्याकडून मोबाईल मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले.

अट्टल मोबाईल चोरट्यास अटक
माधव किशन भोसले (रा. भेंडेगाव ता.लोहा) असे ताब्यात घेतलेल्या अट्टल मोबाईल चोरट्याचे नाव आहे. आरोपी माधव हा आपला भाऊ वैभव किसन भोसले व त्याचा एक मित्र विलास रमेश शिंदे (रा वसमत) याच्या सोबत हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील विविध महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंप व धाब्यावर मुक्कामी थांबलेल्या ट्रकमधील चालक व क्लिनरचा झोपेचा फायदा घेऊन त्यांचा मोबाईल, पॉकेट चोरुन नेत असत. स्वतःचे मोबाईल असल्याचे सांगून हे चोरटे त्या मोबाईलची विक्री करत असल्याचे देखील आरोपींनी कबूल केले आहे. जवळपास सव्वातीन लाख रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्याकडून अजूनही मोबाईल निघण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

विविध पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल -

अटक केलेला आरोपी हा अटल मोबाईल चोरटा असून आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्या अनुषंगाने अजून या आरोपीची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत त्याचे अजून काही साथीदार मिळतात का, तसेच त्याच्याकडे अजून मोबाईल निघण्याची दाट शक्‍यता असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलाकला सागर यांनी सांगितले. कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे,पोहेकॉ संभाजी लेकुळे, भगवान आडे आदींनी केली आहे.

Last Updated : Feb 2, 2021, 10:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details