महाराष्ट्र

maharashtra

'साब पाणी मिलेगा क्या'.. घरी परतणाऱ्या कामगारांची आर्त विनवणी

By

Published : Apr 5, 2020, 8:14 PM IST

Updated : Apr 5, 2020, 8:35 PM IST

संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत सर्वच कामे बंद ठेवण्यात आल्याने, हातावर पोट घेऊन परजिल्ह्यात धाव घेतलेल्या कुटुंबाची मोठी दैना सुरू आहे. हैदराबाद येथून राजस्थान मार्गे अनेक कुटुंब रवाना होत आहेत.

hingoli migrated worker
'साब पाणी मिलेगा क्या'.. घरी परतणाऱ्या कामगारांची आर्त विनवणी

हिंगोली - कोरोनामुळे स्थलांतरीत कामगारांना खूप मोठा फटका बसला आहे. सर्वांची रोजीरोटी अवंलबून असलेला कामधंदा बंद पडल्यामुळे कामगार कुटुंबीय आपआपल्या मायदेशी परत निघाले आहेत. त्यात सामान्यांसाठी वाहतूक बंद असल्यामुळे हे नागरिक पायी चालले आहे. हैदराबाद येथून जथ्थेच्या जथ्थे आपल्या घरी म्हणजे राजस्थानला निघाले आहेत. रस्त्याने साधी त्यांची विचारणा करण्यासाठी वाहन जवळ नेले तर ते खाण्यापिण्याची विनवणी करत आहेत. रस्त्यावर कोणी दिसले की, 'साब खाने को मिलेगा क्या, नही तो पाणी मिलेगा तो भी चलेगा' अशी केविलवाणी विनंती हे लोक करीत आहेत.

'साब पाणी मिलेगा क्या'.. घरी परतणाऱ्या कामगारांची आर्त विनवणी
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत सर्वच कामे बंद ठेवण्यात आल्याने, हातावर पोट घेऊन परजिल्ह्यात धाव घेतलेल्या कुटुंबाची मोठी दैना सुरू आहे. हैदराबाद येथून राजस्थान मार्गे अनेक कुटुंब रवाना होत आहेत. वाहनाद्वारे जाणाऱ्यांना मात्र हिंगोलीत ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रशासन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करीत आहेत. मात्र, अजूनही हैदराबाद वरून राजस्थान मार्गे जाणाऱ्यांची संख्या अजिबात कमी झालेली नाही.

डोक्यावर आणि हातात सगळा संसार आणि लेकरं बाळ घेऊन हे लोक आपल्या गावी चक्क पायी निघाले आहेत. सूर्योदय झाला की मार्गस्थ व्हायचे आणि सूर्यास्त झालेल्या ठिकाणी मुक्काम करायचा, असा दिनक्रम सध्या या लोकांचा सुरू आहे. दिवसभर तहान भूक हरून गावाला जाण्याच्या ओढीने निघालेले हे कामगार रस्त्यावर कोणी दिसेल त्यांना मदत मागत आहेत.

Last Updated : Apr 5, 2020, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details