हिंगोली - आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या योजना असूनही हिंगोलीतील एका तरुणाला मात्र या योजनांचा लाभ होत नसल्याने तो अंथरुणाला खिळून बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील मन्नास पिंपरी येथे ही घटना घडली आहे. नामदेव पांडुरंग सुतार असे या तरुणाचे नाव आहे. नामदेव यांना गेल्या सहा वर्षांपासून ह्रदयाचा त्रास आहे. त्यांचे ह्रदय केवळ वीस टक्केच काम करत असल्याचे डॉक्टरांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याना ह्रदय प्रत्यारोपण करण्यासाठी डॉक्टरांनी 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च येत असल्याचे सांगितले आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने एवढा मोठा खर्च करायचा कसा ? हा प्रश्न वडिलांना व मुलाला पडला आहे. जवळपास सहा वर्षांपासून मुलगा अंथरूनाला खिळून पडला आहे. वडीलही अपंग आहे. नामदेवला ऑक्सिजनची तर नियमित गरज आहे. मात्र हा खर्च परवडणारा नसल्याने वाशिम येथील खाजगी डॉक्टर गोपाल ठाकरे यांनी ऑक्सिजनची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. शिवाय उपचार देखील नाममात्र शुल्क मध्ये केले जात असल्याचे वडील पांडुरंग सुतार यांनी सांगितले.
उपचारासाठी सरकारी योजनांच्या मदतीची अपेक्षा, हिंगोलीतील रुग्णावर बिकट परिस्थिती - hingoli heart transplant patient news
आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या योजना असूनही हिंगोलीतील एका तरुणाला मात्र या योजनांचा लाभ होत नसल्याने तो अंथरुणाला खिळून बसला आहे. नामदेव पांडुरंग सुतार असे या तरुणाचे नाव आहे. नामदेव यांना गेल्या सहा वर्षांपासून ह्रदयाचा त्रास आहे. त्यांचे ह्रदय केवळ वीस टक्केच काम करत असल्याचे डॉक्टरांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यांना ह्रदय प्रत्यारोपण करण्यासाठी डॉक्टरांनी 25 ते 30 लाखरुपयांचा खर्च येत असल्याचे सांगितले आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने एवढा मोठा खर्च करायचा कसा ? हा प्रश्न वडिलांना व मुलाला पडला आहे.
हिंगोली ह्रदय ट्रान्स्फर रुग्ण