महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Farmer Letter To Uddhav Thackeray : 'शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीचं असतं का?',हिंगोलीतील शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र - हिंगोली शेतकरी व्हायरल पत्र

हिंगोलीतील एका शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Hingoli Farmer Wrote Letter To CM Uddhav Thackeray ) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात या शेतकऱ्याने आपली कैफियत मांडली आहे. शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

Farmers Letter To Uddhav Thackeray
Farmers Letter To Uddhav Thackeray

By

Published : Apr 8, 2022, 4:52 PM IST

हिंगोली -हिंगोलीतील एका शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Hingoli Farmer Wrote Letter To CM Uddhav Thackeray ) यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात या शेतकऱ्याने आपली कैफियत मांडली आहे. शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

शेतकऱ्याने काय म्हटले पत्रात -शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का? असा सवाल एका प्रेम करणाऱ्या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे. या पत्रात म्हटले की खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटत आहे. उद्धवसाहेब, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता. त्यांचे प्रश्न सोडवता, माझं कसं काय? असंही या युवकानं म्हटलं आहे. हे पत्र समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

'साहेब उत्तराची वाट बघतोय' -पत्रात युवकानं म्हटलं आहे की, उद्धवसाहेब आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेत आलात. त्यांचे प्रश्न सोडवता. माझं काय? या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा जगातून निघून जाण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. उत्तर कधी देत आहे साहेब, वाट पाहतोय, असं पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा -Power Crisis In State : राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घेऊ - नितीन राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details