हिंगोली- जगभरात मृत्यूचे तांडव माजवणाऱ्या कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत आहे. जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याने कोरोना लढाईत बाजी मारली आहे. रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने हिंगोलीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. रुग्णाला निरोप देताना सर्वजण भावूक झाले होते.
हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त, आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या वाढली - हिंगोली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण नाही
सध्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, मात्र आता आयसोलेशनमधील संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही आकडेवारी सध्या 63 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन गतीने कामाला लागले आहे. तर नागरिकांना रस्त्यावर न येऊ देण्यासाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवत आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण नाही, मात्र आता आयसोलेशनमधील संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही आकडेवारी सध्या 63 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन गतीने कामाला लागले आहे. तर नागरिकांना रस्त्यावर न येऊ देण्यासाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवत आहे. त्याचबरोबर ''मीच रक्षक माझ्या जिल्ह्याचा'' हा उपक्रमच प्रशासनाच्यावतीने राबवण्यात येत आहे. आज घडीला हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे. मात्र दिवसेंदिवस संशयितांची आकडेवारी वाढत असून आयसोलेशनवार्डमध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे.
हिंगोलीतल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये शनिवारी 7 व्यक्ती, वसमत येथील शासकीय क्वॉरंटाईन येथे 45, कळमनुरी येथे 51, तर, औंढा नागनाथ येथे १८ व्यक्ती दाखल झालेत. तर, हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये आतापर्यंत 63 रुग्णांना दाखल केलेले आहे. त्यातील 59 रुग्णांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तर, शासकीय क्वारंटाईनमधील 19 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील व्यक्ती आल्यास त्याची सूचना जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत देऊन त्या व्यक्तीस १४ दिवस शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच त्याची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगितले गेले आहे