हिंगोली- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. हिंगोली जिह्याचा ८०.७७ टक्के निकाल लागला असून यंदाही मुलींनेच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातील मुलीही कमी नाहीत हेच या मुलींनी निकालातून दाखवून दिलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात जिल्ह्यातील ८८२ वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. वाणिज्य शाखेचा निकाल ९०. ४८ लागला असून ७९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.