महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, हळद लागवडीला वेग - हिंगोलीत पाऊस

जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे. नियमितपणे सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हिंगोलीत सलग तिसऱ्या जोरदार पाऊस, हळद लावगड वेगात
हिंगोलीत सलग तिसऱ्या जोरदार पाऊस, हळद लावगड वेगात

By

Published : Jun 11, 2021, 7:09 PM IST

हिंगोली - जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे. नियमितपणे सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामुळे शेतकरी आता आपल्या शेतीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात आता शेतकऱ्यांनी हळद लागवडीच्या कामासह शेतीतील इतरही कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कोरोना काळात काम नसलेल्या मजुरांना काही प्रमाणात रोजगार मिळाला आहे. दरम्यान, बऱ्याच ठिकाणचे नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत.

हिंगोलीत सलग तिसऱ्या जोरदार पाऊस, हळद लावगड वेगात

ट्रॅक्टरच्या आधारे हळद लागवड

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत केली आहे. विशेष म्हणजे शेतीचे कामे वेगाने होण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा आधार घेतला आहे. तर, काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने हळद लावगड सुरु केली आहे. तर, काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या आधारे हळद लागवड सुरु आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी हळदीची लागवड करत आहेत. त्यामुळे यंदा हळदीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हळदीचा बाजार भावही कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. हळदीचे बीयाने अडीच ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. मागील वर्षीच्या हंगामात हळदीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे यंदा शेतकरी हळद पिकाकडे वळला आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रॅक्टरसह मजुरांकडून हळद लागवड

दोन वर्षापासून कोरोना महामारीने प्रत्येकजण अडचणीत सापडला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत सापडला होता. परंतु, आता खरीप हंगामात शेतीचे काहीतरी कामे सुरु झाल्याने, शेतकऱ्यासह व्यापारी वर्ग काही प्रमाणात सुखावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details