हिंगोली : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. यातच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या पाठोपाठ आता जिल्हा आरोग्याधिकारी अन् दुसरा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, जिल्हा परिषद परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
हिंगोलीत कोरोनाची हद्दच, जिल्हा आरोग्याधिकारीही आढळले कोरोना पॉझिटिव्ह - district health officer corona positive hingoli news
हिंगोली जिल्ह्याचे आरोग्याधिकाऱ्यांसह अन्य एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना, अधिकारी, कर्मचारी जीवाचे रान करून, या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी हे ग्रामीण भागात जाऊन, कोरोनापासून वाचण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. मात्र, त्यांच्यासह अन्य एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
यापूर्वी देखील आरोग्य अधिकारी यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने, त्यांनी स्वतःला वेगळे ठेवले होते. मात्र, अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. आता मात्र त्यांच्यासह अन्य एका कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी अजिबात घाबरून न जाता, सर्वांनी नियमाचे पालन करावे, सोबतच सामाजिक अंतर राखावे. कोणीही मास्क विना अजिबात घराच्या बाहेर न पडता, कोरोनाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब आपल्या जवळच्या आरोग्यकेंद्रात तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.