हिंगोली-जिल्ह्यात 495 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चिन्ह वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. उद्यापासून प्रचारास सुरुवात होणार आहे. आपल्या पसंतीचे चिन्ह मिळवण्यासाठी उमेदवारांची स्पर्धा लागल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
गावाचे मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. मात्र यावेळी आपल्या पंसतीचे चिन्ह मिळावे यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न सुरू होते. निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना विविध चिन्ह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र उमेदवारांनी गॅसच्या चिन्हाला सर्वाधिक पसंती दिली, तसेच हेच चिन्ह आपल्याला मिळावे अशी मागणी अनेक उमेदवारांनी अधिकाऱ्यांकडे केल्याचेही पाहायला मिळाले.
गॅस हेच चिन्ह हवे