हिंगोली - भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन' यांची पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर देशभरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही नागरिकांच्या वतीने 'अभिनंदन' यांच्या सुटकेचे जल्लोषात स्वागत केले. यामध्ये तरुणाईसोबतच वयोवृद्धदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी शहरात तिरंगा फडकवत मिठाईचे वाटप करण्यात आले.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेचा हिंगोलीत जल्लोष - विंग कमांडर
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन' यांची पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात नागरिकांच्या वतीने 'अभिनंदन' यांच्या सुटकेचे जल्लोषात स्वागत केले.
पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त भारताचे सैनिकांना वीरमरण आले होते, त्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी संघटनेचे स्थळ उध्वस्त केले. मात्र, या हल्ल्यादरम्यान हवाई दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन' यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आले. मात्र, 'अभिनंदन' यांना पाकिस्तानने सही सलामत परत केल्याने देशात त्यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी हिंगोलीतील गांधी चौकात फटाके फोडून आणि मिठाई वाटून अभिनंदन यांचे स्वागत केले गेले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश बगडिया, विनोद कुमार परतवार, प्रकाशचंद सोनी, धरमचंद बडेरा, सुदर्शन कंदी, दिपक सावजी, महावीर भवन ट्रस्टचे अध्यक्ष निश्चल यबल, कांता गुंडेवार, विलास गोरे, बाबा घुगे, संजय ढोके, रविंद्र सोनी, संदिप महाजन आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.