हिंगोली -खुलेआम हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या पाच जणांपैकी दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली : तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना एटीएसने ठोकल्या बेड्या - hingoli crime news
तलवार घेऊन फिरणाऱ्या पाच जणांपैकी दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तलवार व बँकेचे पासबुक, चेक, कागदपत्रे, छत्री, स्क्रू ड्रायव्हर, मोबाईलसह एकूण 37 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
![हिंगोली : तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना एटीएसने ठोकल्या बेड्या hingoli-ats-arrest-two-person](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8934273-853-8934273-1601031892561.jpg)
गोपाल कैलास गाढवे, भागवत डिंगाबर कोल्हे, भगतसिंग जमाल सिंग खोलवाल (रा. पळशी जि. औरंगाबाद), सुदाम नामदेव दिघोळे (रा. निभोरा जि.औरंगाबाद), ज्ञानेश्वर कैलास गाढवे (रा. सेनगाव) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपी हे हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात गोंधळ घालत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना मिळाली. त्यानुसार, चिंचोळकर यांच्यासह रुपेश धाबे, महेश बांडे, वाहतूक शाखेचे कापसे, शिवाजी पारसकर, वसंत चव्हाण आणि फुलाजी सावळे या पथकाने आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. गोपाल कैलास गाढवे आणि भागवत डिंगाबर कोल्हे या दोघांना पकडण्यात पोलिसांंना यश मिळाले असून उर्वरित तिघे फरार झाले.
या आरोपींकडून तलवार व बँकेचे पासबुक, चेक, कागदपत्रे, छत्री, स्क्रू ड्रायव्हर, मोबाईलसह एकूण 37 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील भगतसिंग खोलवाल हा आरोपी बनावट कागदपत्रे तयार करून विविध सरकारी कर्यालयात भरती करतो सांगून नागरिकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती उघड झाली आहे.