हिंगोली - जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सायंकाळी सहा वाजल्यापासून विविध भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता शेतात उरलीसुरली खरिपाची पिके ही खराब होण्याच्या मार्गावर आहेत. तर विविध भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पाणी उपसण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ वाहनचालकांवर येऊन ठेपली होती.
हिंगोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाची हजेरी; पिकांचे नुकसान - हिंगोलीत मुसळधार पाऊस
हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता शेतात उरलीसुरली खरिपाची पिके ही खराब होण्याच्या मार्गावर आहेत. तर विविध भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पाणी उपसण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ वाहनचालकांवर येऊन ठेपली होती.
अगोदरच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर निसर्गाची अवकृपा येऊन ठेपली आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच अधूनमधून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. आता तर पावसाचा एवढा वेग वाढलाय की, नदीकाठच्या शेतातील पिके ही पूर्णपणे खरडून गेली आहेत. तर ओढ्या लगत असलेल्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पिकेही सडून गेलीत.
एवढेच नव्हे तर अनेक भागात तर एवढा पाऊस झालाय की, त्यामुळे या भागातील शेतीच्या शेती खरडून गेली आहे. यावर्षी शेतकऱ्यावर दुहेरी नव्हे तर तिहेरी संकट येऊन ठेपले आहेत. आज सुरु असलेल्या पावसाचा वेग एवढा आहे, की त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे. हिंगोली शहरात तर ढग फुटी सारखाच पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेताचे नेमके किती नुकसान होईल याचा काही अंदाज नाही.