महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; खरीप पिकांना मिळणार संजीवनी - heavy rainfall in hingoli

खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन आणि हळद पिकाला पावसाचा फायदा होणार आहे. चार पाच दिवस पाऊस झाला नसल्याने काही शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली होतीय

rain starts in hingoli
हिंगोलीत पावसाची हजेरी

By

Published : Sep 13, 2020, 5:05 PM IST

हिंगोली- जिल्ह्यातील विविध भागात आज दूपारनंतर तीन वाजता मूसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा खरीप पिकांना फायदा होणार आहे. पावसाची सोयाबीनच्या शेंगामधील दाणे भरण्यास चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. हळद पीक देखील आता धोक्याबाहेर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगतिले आहे.

मागील चार ते पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे हा पाऊस खरीप पिकाच्या वाढीसाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. सोयाबीन, हळद पिकासाठी हा पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरत आहे. चार ते पाच दिवस पावसाने खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती.

ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीमध्ये पाणी उपलब्ध होते. त्या शेतकऱ्यांनी आपापल्या परीने खरिपाची पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली होती. वन्य प्राण्यांच्या तावडीतून वाचलेल्या पिकांना पावसाचा फायदा होणार आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम हा शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-धक्कादायक! कापसाच्या शेतात गांजाची शेती; दहशतवादविरोधी पथकाकडून पर्दाफाश

सोयाबीन काढणीच्या वेळेस जर पावसाने उघडदीप दिली तर मागील वर्षाचे नुकसान या वर्षी भरुन निघण्याची शक्यता आहे. येत्या वीस ते पंचवीस दिवसांत सोयाबीन काढणीस येणार आहे. काही शेतकरी सोयाबीन काढणीच्या नियोजन करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details