महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान - Heavy rain

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. डिग्रस कऱ्हाळे येथे वीज पडून हळदीच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

By

Published : Sep 21, 2019, 8:10 AM IST

Updated : Sep 21, 2019, 5:32 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात काल दि. (20 सप्टेंबर) ला विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. डिग्रस कऱ्हाळे येथे वीज पडल्याने हळद पिकाचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

हे ही वाचा -पंधराशे रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. शहरात सध्या राज्य महामार्गाचे काम असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे. तसेच अनेक गावात रस्त्याचीदेखील कामे सुरू आहेत. मात्र, या पावसामुळे रस्ते निर्मितीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, वाहनचालकांनाही रस्त्यातबन वाट काढणे कठीण झाले आहे. जागो जागी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात ही घडत आहे. या पावसाचा खरीप पिकांना फायदा होत असला तरी उडीद मुगाचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..

हे ही वाचा -हिंगोलीत राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाची पक्षाला सोडचिठ्ठी, वंचितमध्ये प्रवेश

Last Updated : Sep 21, 2019, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details