हिंगोली- जिल्ह्यात ६ जूनच्या रात्रीपासून मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. मृगनक्षत्राच्या दिवशीही पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून खरीप पेरणीपूर्व शेती मशागतीला वेग येणार आहे.
हिंगोलीत मृगनक्षत्राच्या दिवशीच पावसाची दमदार हजेरी; अनेक घरांचे नुकसान - rain in hingoli
हिंगोली जिल्ह्यात सलग ३ ते ४ दिवसांपासून पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पहाटेपर्यंत एक सारखा विजेच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता.

जिल्ह्यात सलग ३ ते ४ दिवसांपासून पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पहाटेपर्यंत एक सारखा विजेच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता. सोसाट्याच्या वार्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात विद्युत खांब वाकले. तसेच जागोजागी झाडे उन्मळून पडली आहेत.
जिल्ह्यातील गोजेगाव येथे घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. घरावरील आणि गोठ्यांवरील टिनांची पत्रे उडून गेल्याने अनेकजण जखमी झाले, तर गुरांनाही मार लागला आहे. तसेच पेडगाव वाडी परिसरात विज पडून एक बैल दगावला आहे. वादळामुळे विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता.