हिंगोली - जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, ईसापूर आणि सिद्धेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे येलदरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान, पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या शेतशिवारात पाणी शिरले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पावासाचा जोर कायम आहे. माळरानातील शेतीसाठी हा पाऊस लाभदायक असला तरी नदी काठच्या शेतात मात्र पाणी शिरत असल्याने, खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान, मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांचे आणि मजुरांचे हाल सुरू आहेत.