हिंगोली- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली नाही. त्यामुळे नदी व नाल्यालगत असलेल्या शेतशिवारात पावसाचे पाणी शिरत आहे. अर्ध्या शेतातील पिके ही खरडून गेली आहेत. तर उरली सुरली पिके ही साचलेल्या पावसामुळे सडून गेली आहेत.
हिंगोली जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी - Monsoon rain in Hingoli district
बुधवारपासून सुरू असलेला पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम आहे. पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोनामुळे भांबावून गेलेला शेतकरी पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करत आहे.
बुधवारपासून सुरू असलेला पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम आहे. पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोनामुळे भांबावून गेलेला शेतकरी पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करत आहे.
पावसाचेे प्रमाण जास्त असल्याने वाहन चालकांना वाहन चालवत असताना जवळचेही दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
शेती शिवारात साचलेले पाणी शेतकऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकाची वाढदेखील खुंटलेली आहे. यावर्षी सतत सुरू असलेल्या पावसामुळे, शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. नुकसानभरपाई मिळावी या मागणीचे शेतकरी प्रशासनाला निवेदन देत आहे. सरकारच्या मदतीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.