महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस; शेतकऱ्यांना लागले पेरणीचे वेध - हिंगोली पाऊस न्यूज

जिल्ह्यात दोन दिवसापासून अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोबतच नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांना आता खरीपाच्या पेरण्या करण्याचे वेध लागले आहेत.

Rain
पाऊस

By

Published : Jun 11, 2020, 8:00 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोबतच नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांना आता खरीपाच्या पेरण्या करण्याचे वेध लागले आहेत मात्र, त्यासाठी शेत वाफश्यावर येण्याची प्रतिक्षा करावी लागेल.

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी

जिल्ह्यात दोन दिवसापासून अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची जोरदार पावसाची प्रतीक्षा संपली आहे. कृषी केंद्रावरदेखील खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. आज खंडाळा, जयपूर, मळहिवरा, बसांबा, पारोळा या भागात जोरदार पाऊस झाला. काल (बुधवारी) जिल्ह्यात 239 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details