हिंगोली - कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची जराही पर्वा न करता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. तसेच राज्यात काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस अन् इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत येथे पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 48 अधिकारी आणि 841 कर्मचाऱ्यांची तपासणी झाली.
हिंगोलीत पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी - हिंगोली लेटेस्ट न्यूज
राज्यात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असताना देखील इतर पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची वैद्यकीय शिबिरात तपासणी करण्यात आली. मधुमेह, ह्रदयरोग, थर्मल गनच्या सहाय्याने तापाची तपासणी, ऑक्सिजन लेव्हल, रक्तदाब, अस्थीरोग, त्वचारोग आदी महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 48 अधिकारी आणि 841 कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
सद्या कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक घटकातील व्यक्ती प्रयत्न करत आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. लॉकडाऊन असल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मात्र दिवसरात्र जीवाची जराही पर्वा न करता रस्त्यावर नागरिकांच्या संरक्षणासाठी तैनात आहेत. राज्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असताना देखील पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय शिबिरात तपासणी करण्यात आली. मधुमेह, ह्रदयरोग, थर्मल गनच्या सहाय्याने तापाची तपासणी, ऑक्सिजन लेव्हल, रक्तदाब, अस्थीरोग, त्वचारोग आदी महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 48 अधिकारी आणि 841 कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हिंगोलीत 30, तर वसमत येथे दहा तज्ज्ञ डॉक्टरांकडून ही तपासणी करण्यात आली. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन हिंगोलीचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण तापडिया, सचिव डॉक्टर मनिष बगडिया यांच्यासह त्यांच्या सदस्यांनी सहकार्य केले, तर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले.
डॉक्टर संघटनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करून समाजासमोर एक चांगला संदेश दिल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले. दिवस-रात्र बंदोबस्त करून सर्वांना संरक्षण देणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे स्वस्थ राहील, यासाठी आम्ही वेळोवेळी तत्पर राहणार असल्याचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण तापडिया यांनी सांगितले. यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, ए. जी. खान, सतीश देशमुख, अश्विनी जगताप आदींनी परिश्रम घेतले.